किशोर साहू: मौदा :- लहरों को शांत देख कर ये न समझना की समंदर में रवानी नहीं है.. जब भी उठेंगे तूफान बन के उठेंगे…!
अगदी असच म्हणत खात- रेवराल जिल्हा परिषद सर्कल मध्ये मातब्बर अनुभवी राजकीय धुरंघर विरोधकांना पराभवाची चव चाखायला लावणारे आणि आपल्या विजयाने अनेक विरोधकांना घरी बसवणारे, अल्पावधीतच तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आपली ओळख निर्माण करणारे मौदा तालुक्यातील खात येथील भाजपाचे कर्तृत्ववान समाजसेवक आणि नंतर राजकारणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खात- रेवराल जिल्हा परिषद सर्कल मधील शेकडो नागरिकांना भेडसावणारी मुख्य समस्या खात व रेवराल येथील रेल्वे फाटक पासून सर्कल, तालुका व जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सतत पाठपुरावा करत , रस्त्यांबरोबर उड्डाणपूल मंजूर करून ,आपल्या व आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य राधा मुकेश अग्रवाल यांच्या राजकीय कारकिर्दीतच त्याचे काम पूर्ण करून, मुकेश अग्रवाल हे नुसतं आश्वासन देऊन फटाके फोडणारे नेता नव्हे तर खात व रेवराल या दोन्ही रेल्वे स्थानकाचे रेल्वे फाटका बंद करून उडान पूल तयार करणारा नेता, असे छातीठोकपणे आज आपल्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना आपल्या सर्कलमधील आपला मित्र परिवार सांगत आहे.
सामान्य माणसे डोळे झाकून स्वप्न पाहतात व डोळे उघडताच स्वप्नदेखील विसरतात. मात्र काही माणसे असामान्य असतात, जी डोळे उघडे ठेवून समाजहिताची स्वप्ने पाहतात व ती स्वप्ने पुर्ण करण्यासाठी आयुष्यभर झटतात. त्या स्वप्नांचा प्रामाणिकपणे पाठपुरावा करतात. अगदी असेच असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे भाजपाचे तालुका अध्यक्ष मुकेश अग्रवाल हे होय. त्यांनी राजकारण करताना सर्वसामान्य माणसाच्या हाकेला उभा राहणारा जननायक, कार्यसम्राट अशी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपली झेप सध्या पंचायत समिती सदस्य ते तालुका कार्याध्यक्ष व मागील वर्षी तालुका अध्यक्ष. त्यांनी आपल्या पदाचा वापर मतदारांचे हित डोळ्यासमोर ठेवुन खात – रेवराल जिल्हा परिषद सर्कल मध्ये आपल्या पत्नी सोबत जीवाचे रान करीत विकासाची गंगा हातात घेऊन संपूर्ण चित्र त्यांनी क्षेत्राचे बदलवून टाकले. राज्याचे महसूलमंत्री तथा चंद्रशेखर पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने व त्यांच्या आशीर्वादाने त्यांना राजकारणात मोठा राजयोग मिळाला. ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यासाठी अग्रवाल यांनी अहोरात्र कष्ट घेऊन या सर्कल मध्ये नवसंजीवनी दिली आहे.
भाऊ आपण कर्तबगार आहात, नव्हे काळाने आपल्या कुंडलीत टाकलेला राजयोग हा अतिशय महत्त्वाचा आहे. भल्याभल्यांना जे जमले नाही, ती किमया आपण खात रेवराल जिल्हा परिषद या मतदारसंघात करून दाखविली. पहिल्याच दणक्यात आपण लोकशाहीच्या सर्वोच्च अशा मंदिरात अर्थात राजकारणात प्रवेश केला. हा प्रवेश विधिलिखित होता असा आपला मित्रपरिवार मानत आहे. कारण यात आपण आजपर्यंत केलेली मेहनत दडलेली आहे. मौदा तालुक्यातील खात या छोटयाशा गावातून सुरू झालेला आपला राजकीय प्रवास आज तालुक्याच्या व जिल्ह्याच्या टोकापर्यंत पोहोचला आहे. ही सर्व किमया नक्कीच आपल्याला आई वडिलांकडून मिळालेल्या पुण्याईच्या बळावर करता आली असेही आपल्या मित्र परिवाराचे मत आहे. भाऊ आपण जमिनीशी जुळलेले कार्यकर्ते आहात. प्रचंड अनुभव आपल्या पाठिशी आहे. कार्यकत्यांना नेमके काय हवे याचीही आपल्याला पुरेपूर जाण आहे. दिलेला शब्द पाळण्यात आपण अग्रेसर आहात. राजकीय व्यक्ती बहुतांश प्रसंगात शब्द पाळत नाहीत, परंतु आपली बातच न्यारी आहे, भाऊ. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, देव तेथेचि जाणावा याचीही प्रचिती आपल्या मित्र परिवारा आपल्याला भेटल्यानंतर आली आहे. राजकारण म्हणजे बहुसंख्यांचाच दबदबा असाच पायंडा आहे, मात्र मौदा तालुक्यात अग्रवाल घराण्याचे असतांनाही केवळ प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी व संघर्षातून राजकीय अस्तीत्व तयार करून हजारोंच्या मनात राज्य करणारे, आपल्या कार्यकर्तृत्वाच्या भरवशावर कामाचा ठसा उमटविणारे नेतृत्व म्हणजे मुकेश अग्रवाल. आज भाजपाचे मौदा तालुका अध्यक्ष पद यशस्वीरित्या सांभाळत ते आपली राजकीय कारकीर्द चालवत असून यासह आपल्या अग्रवाल समाजातही त्यांनी याच धडपडीने आपले मानाचे स्थान तयार केले आहे. घरात राजकीय कुठलीही पार्श्वभूमि नाही. त्यावेळी घरातील आर्थिक परिस्थितीही हलाखीचीच असा दुहेरी विरोधाभास असतांनाही केवळ दृढ निश्चय व नागरिकांचे काम करण्याचा प्रामाणिकपणा, जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून 24 तास धावून जाण्याची निस्वार्थी वृत्ती यामुळे ते नकळतच खात जिल्हा परिषद सर्कलचा किंबहुना तालुक्याच्या राजकीय पटलावर जनसामान्यांच्या व पाठीराख्यांच्या भक्कम पाठींब्याने आपला ठसा उमटविण्यात भाऊ आपण यशस्वी झाले. राजकारणात देखील चांगल्या माणसांचा वावर असल्याचे देखील नाकारता येत नाही. ही संख्या कमी जरी असली तरीही राजकारणावरचा विश्वास टिकवून ठेवणारी असल्यानेच आपली लोकशाही टिकून आहे .
राजकारणात असूनही राजकारणी नसलेला आश्वासक चेहरा मुकेश अग्रवाल यांच्या रूपाने भाजपला ला मिळाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन सतत समाजकारण करणारा आणि राजकारणाच्या वेळीच राजकारण करणारा चेहरा म्हणून देखील मुकेशभाऊ अग्रवाल यांच्याकडे बघितल्या जाते. राजकारणात देखील त्यांनी आपल्या नावाला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे. राजकारणाच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करता येते, लोकांना मदत करता येते, सामाजिक कार्याचा आपला पिंड जोपासता येतो याची जाणीव त्यांनी सातत्याने ठेवली. खात- रेवराल जिल्हा परिषद सर्कल सारख्या छोटयाशा सर्वसमावेशक गावात समाजसेवा करत असतांना सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका मुकेश कड़े आलेली आहे. कुटुंबात असतांना मुकेश यांनी त्याचा माज कधी येऊ दिला. सर्कल मधील जनतेन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शाहू, फुले ,आंबेडकर विचारसरणी जपत राजकारण करत असतांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या समस्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांची राहत असल्याने भाजपा मधील एक आश्रासक चेहरा म्हणून मुकेशभाऊ अग्रवाल यांच्याकडे मोठ्या आशेने बघितल्या जाते.
राजकीय जिवनात वावरत असतांना सामाजिक जिवनातही त्यांनी आपले कार्य हे अविरतपणे सुरूच ठेवलेले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातील सक्रीय सहभाग बघता अग्रवाल समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याकडे हक्काने बघितल्या जाते. घरात कुठलीही राजकीय पार्शवभूमि नसतांना अल्पसंख्यांक समाजातून असतांनाही तालुक्याच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी असलेले मुकेश आज आपला वाढदिवस साजरा करीत असून,आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्णत्वास जावोत. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, हीच टेकडी गणेशाचरणी, शिर्डीच्या साईबाबा चरणी व शेगावच्या गजानन महाराजचरणी नम्र प्रार्थना.