कामठी :- सेवा हक्क दिनानिमित्त शपथग्रहण कार्यक्रमाअंतर्गत अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरण पार पडला.नागरिकांना वेळेत पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प यावेळी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यानी घेतला.
‘जनतेची सेवा हीच आमची जवाबदारी’या भावनेने प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करण्याची शपथ घेतली. यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी विनोंद जाधव, महेश चोबे,सुशांत जगताप, प्रदीप भोकरे तसेच अधिकारी कर्मचारी यांनी सेवा हक्क कायद्याचे महत्व अधोरेखित करून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.प्रशासन अधिक उत्तरदायी पारदर्शक लोकाभिमुख करण्यासाठी हा उपक्रम एक मह्तवाचा टप्पा ठरणार आहे.कामठी शहरातील प्रत्येक नागरिकाला योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सेवा मिळावी ,त्यांच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही शपथ घेण्यात आली.