spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मतदार यादी पूर्व निरीक्षण साठी प्रभाग 4 मध्ये शिबिर चे आयोजन

कामठी :- प्रभाग 4 मध्ये मतदार यादी पूर्वनिरीक्षण प्रक्रियेसाठी नागरिकांच्या सुविधेसाठी नगरसेवक अनिल सुर्यवंशी यांच्या पुढाकारातून आयोजित एस आय आर मॅपिंग शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराचे आयोजन प्रभाग चार चे नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांनी रमाई बुद्ध विहार आंबेडकर पुतळ्याजवळ तसेच मोदी पडाव अशा विविध स्थानावर केले होते. या शिबिर चा मुख्य उद्देश नागरिकांचे मतदान यादी मध्ये नाव जोडणे व या अंतर्गत येणाऱ्या अन्य प्रक्रियेला सोपे बनवणे हे होते.

या शिबिरला यशस्वी बनवण्या साठी नगरपरिषद अधिकारी व बीएलओ त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

त्या शिबिराच्या अंतर्गत येणाऱ्या बीएलओ सदस्यांनी पूर्ण तत्परतेने नागरिकांना आपल्या सेवा प्रदान केल्या व नागरिकांच्या समस्यांचे व्यवस्थितरित्या निराकरण करण्यात आले. या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येत नागरिकांनी घेतला.

शासकीय प्रशासन व सामाजिक कार्यकर्ता यांच्या मिळून केलेल्या कार्याबद्दल मतदार नागरिकां द्वारे या शिबिराचे प्रशंसा करण्यात आली. (SIR)मॅपिंग शिबिर यशस्वी रित्या पार पडले.

Popular Articles