spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मेडिकलमधील कामांबाबत मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त

– विविध विकास कामांची पाहणी

नागपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील विविध विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, नगरसेवक रितेश गावंडे उपस्थित होते.

आज दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांचे नागपुरात आगमन होताच विमानतळावरून त्यांचे थेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आगमन झाले. तेथे ट्रान्सप्लांट ओटी, डायलिसिस सेंटर, कार्डीयक आयसियु, प्रतीक्षालय यांची पाहणी करून परिसरातील क्रीडा संकुल, जलतरण तलाव यांना भेट दिली. त्यानंतर ते मेडिकलमध्ये आले. तेथे प्रतीक्षालय, ओटी डी, वॉर्ड ३६, प्रतीक्षालय येथील कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या तसेच वैद्यकीय महाविद्यालयात चांगले शिक्षण मिळावे, यावर आमचा भर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करून विकासकामांची माहिती दिली. यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर, मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, उप अधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles