spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एलआयसीत कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा

– ”जो मजदूर हित की बात करेगा, वही देश में राज करेगा”

नागपूर :- भारतीय आयुर्विमा महामंडळातील सर्वात मोठी व प्रमुख संघटना नागपूर विभागीय एलआयसी कर्मचारी संघटने च्यावतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिवस स्थानिक ओरिएंटल बिल्डिंग येथे संघटनेचे अध्यक्ष शिवा निमजे यांचे शुभ हस्ते संघटनेचा लाल झेंडा फडकवून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कामगार नेते अनिल ढोकपांडे, धनराज डोंगरे, पी व्ही मिलिंदकुमार, वाय आर राव, नरेश अडचुले व कार्यक्रमाध्यक्ष शिवा निमजे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शोषणाविरूध्द संघर्षाची प्रेरणा देणाऱ्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे महत्त्व विशद करीत देशाच्या औद्योगिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या कामगारांना त्यांनी क्रांतिकारी शुभेच्छा दिल्या. भारत सरकारच्या कार्पोरेटधार्जिण्या कामगारविरोधी धोरणांमुळे अनेक वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षातून कामगारांनी मिळविलेले हक्क व अधिकार धोक्यात आले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी एकजूटीने सर्वसमावेशक असा व्यापक लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी आपापल्या भाषणातून केले.

या कार्यक्रमाला विमा कर्मचारी व पेंशनर्स बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार संघटनेचे महासचिव वाय आर राव यांनी मानले. ‘इन्कलाब जिंदाबाद’ ‘जो मजदूर हित कि बात करेगा, वही देश में राज करेगा’ या घोषणा देत कार्यक्रमाची सांगता झाली. यशस्वीतेसाठी सर्वश्री राजेश विश्वकर्मा, सलील मुळे, संदिप लातुरकर, प्रिती पात्रे, संजय झंझोटे, राजेश विश्वकर्मा, प्रणब किरण, रवि बन्नागरे, राजकुमार फुलबांधे, नरेंद्र उमाळे आदिंनी सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.