कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी या न्यासाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. यादवरावजी भोयर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २ मे २०२६ ला सकाळी १०.०० वाजता संस्थेच्या कामठी येथील शैक्षणिक परिसरातील भोयर यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, सचिव सुरेश भोयर, उपाध्यक्षा अनुराधा भोयर, कार्यकारी संचालक अनुराग भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने संस्थेद्वारे संचालित फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, कामठी तंत्रनिकेतन चे प्राचार्य मुकेश घोळसे, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप कोहळे, शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य रामेश्वर जयभाये, प्राध्यापिका डॉ रुपाली पाटील, कामठी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या ईशा मुदलियार, गादा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अतुल हेमके तसेच संस्थेतंर्गत शाळा आणि महाविद्यालयाचे सर्व वरिष्ठ प्राध्यापक गण, शिक्षक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यावेळी स्व यादवरावजी भोयर यांना आदरांजली अर्पण केली.