शनिवारी (२/५/२०२६ )रोजी जाहीर झालेल्या वर्ग बारावीच्या निकालात कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत सुयश मिळविले आहे.
विज्ञान शाखेचा निकाल ९९.४० टक्के लागला असून जेअलिझा फिरदोस अन्सारी या विद्यार्थिनीला ८६.५०% गुण मिळाले असून
ही विद्यार्थिनी विज्ञान शाखेतून प्रथम आली असून नंदिनी एकनाथ बावनकुळे ही द्वितीय आली या विद्यार्थिनीला ८६.३३% गुण मिळाले तर अदिती राम घोटेकर या विद्यार्थिनीला ८३.८३% गुण मिळाले.
वाणिज्य विभागाचा निकाल
६७.४% लागला असून कुमारी राधा जीवनलता अग्रवाल या विद्यार्थिनीला ९४.३३% गुण मिळाले असून ती वाणिज्य शाखेतून प्रथम आली असून भक्ती संजय नानकानी या विद्यार्थिनीला ,९२ टक्के तर शाक्य राजेश गोरे या विद्यार्थ्याला ८६% गुण मिळाले.कला शाखेचा निकाल ४४.१८ टक्के लागला असून संजीवनी सुरेश खुरपडे ही विद्यार्थिनी प्रथम आली असून तिला ६४.६७%, तर टीना मुकेश गवारे या विद्यार्थीनीला ६३.५.% तर मिसबाह सादिक या विद्यार्थ्याला ६२.५% गुण मिळाले .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ स्वप्नील दाहात ,उपप्राचार्य प्रा. विश्वनाथ वंजारी व पर्यवेक्षक प्रा एन डी मेंढे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी केले.