spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सर्व प्रभागांमध्ये योग्य दाबाने नियमित पाणीपुरवठा करा

– जलप्रदाय समिती सभापती दिव्या धुरडे यांचे निर्देश

नागपूर :- जलप्रदाय विशेष समिती सभापती दिव्या धुरडे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती विजय झलके यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता.७) लक्ष्मीनगर आणि हनुमाननगर झोनमधील जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यू अधिकाऱ्यांसोबत विविध प्रभागांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठा संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व प्रभागांमध्ये किमान २ तास योग्य दाबाने, नियमित पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत लक्ष्मीनगर झोनच्या सभापती लक्ष्मी यादव, हनुमाननगर झोनच्या सभापती ज्योती देवघरे, , शिक्षण विशेष समितीच्या उपसभापती भारती बुंडे, नगरसेवक जितेंद्र भुगावकर, योगेश मडावी, अजय बोढारे, बाबाराव तायडे, संजय ठाकरे, रमेश भंडारी, महेंद्र भुगावकर,  मानकर, शिला तराळे, विशाखा मोहोड, मनीषा नगरधनकर, लक्ष्मीनगरचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर आणि कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत नगरसेवकांनी प्रभागांतील पाणी पुरवठ्याशी संबंधित तक्रारी मांडल्या. बहुतांश नगरसेवकांनी योग्य दाबाने व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी केली. यावर सभापती दिव्या धुरडे यांनी जलप्रदाय आणि ओसीडब्ल्यूला सर्व प्रभागांत किमान २ तास नियमित पाणीपुरवठा करणे, टँकर्सची संख्या वाढवणे, ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होत असेल त्या भागात तत्काळ दुरुस्त करणे आणि खोदकाम केलेले रस्ते त्वरित पूर्ववत करण्याचे निर्देश दिले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.