spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुर्दाबाद चे नारे देत सावनेर येथे बागेश्वर बाबा विरूद्ध भव्य निषेध मोर्चा

– बागेश्वर बाबा, आनंद स्वरूप, संजय गायकवाड यांना अटक करण्याची मागणी

सावनेर :- बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी गरळ ओकणाऱ्या धिरेन्द्र शात्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरुद्ध सावनेर येथे पुरोगावी विचारधारा तसेच विविध सामाजिक संघटनेच्यावतीने शुक्रवार दि. 8 मे रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात धिरेन्द्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा, आनंद स्वरूप बाबा, आ.संजय गायकवाड, मोहन भागवत, देवेन्द्र फडणविस, नितीन गडकरी विरोधात मुर्दाबाद चे नारे देत बागेश्वर बाबा, आनंद स्वरूप, संजय गायकवाड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

काही दिवसापुर्वी नागपूर जामठा येथे नॅशनल कॅन्सर हॉस्पीटल परिसरात झालेल्या भारत दुर्गा मंदीर भुमिपुजन व कोनशिला अनावरण सोहळया प्रसंगी धिरेन्द्र शास्त्री उर्फ बागेश्वर बााब याने ” एका युद्ध मोहीने नंतर शिवाजी महाराज थकले होते, आणि ते रामदास स्वामी कडे गेले, त्यांनी आपला मकुट काढून त्यांच्या पायाशी ठेवत “आपण थकलो असून आता राज्य कारभार सांभाळावा” अशी विनंती केली. रामदास स्वामीने ती मान्य केली. पुढे त्यांनी तू माझा शिष्य आहेस, आणि मी तूझा गुरू! असे सांगत पुन्हा मुकुट शिवाजी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि राज्य कारभार चालविण्याची जवाबदारी त्यांच्यावर सोपवली. असे मोहन भागवत, देवेन्द्र फडणविस, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत खोटे वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला. मात्र यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या मोहन भागवत, देवेन्द्र फडणविस, नितीन गडकरी यांना बागेश्वरला थांबवून चूक दुरूस्त केली नाही. यामुळे बहुजन समाजात संघ व भाजप विषयी नाराजी निर्माण झाली असून संघातील व भाजप मधील अनेक बहुजनांनी शिव प्रेमिंनी मोर्चा काढण्यास छुपा पाठींबा दर्शविला होता.

भाजप निवडून आल्यापासून तर दर दोन-तीन महीन्याच्या अंतरावर भोंदू साधू तसेच राजकिय पुढारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास मांडून अवमान करित असतो. यामुळे सर्व शिव प्रेमीने आक्षेप घेतला असून सावनेर येथील सर्व पुरोगामी विचारधारेच्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 8 रोजी दुपारी 1 वा सावनेर तहसिलदार यांना निवेदन देत बागेश्वर बाबा, आनंद स्वरूप बाबा, आ. संजय गायकवाड यांना अटक करून महाराष्ट्रबंदी घालण्याची मागणी करण्यात आली. सायंकाळी 6 वा. सावनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करून शिवाजी कोण होता? हे कॉ. गोविद पानसरे लिखित पुस्तक वाटत व वाचन करून हा मोर्चा होळी चौक, बाजार चौक, गडकरी चौक, ते गांधी पुतळा येथे समारोप करण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे जयघोष करून धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा, आनंद स्वरूप बाबा, आ.संजय गायकवाड, मोहन भागवत, देवेन्द्र फडणविस, नितीन गडकरी विरोधात मुर्दाबाद चे नारे देत निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान ईव्हीएम हटाव, देश बचाव ओबीसी जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे! असेही नारे देण्यात आले. यावेळी जयशिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले, दीपक ढोके, उत्तम कापसे, अॅड. गुजाजी बरडे, सेवकराम राऊत, विक्रम गमे, पंकज घाटोळे, साहेबराव विरखरे, शंकर आगलावे, गोपाल घटे, सुभाष मछले, संजय टेंभेकर, संजय राऊत, जामुवंत वारकरी, संदीप भोंगाडे, प्रशांत ठाकरे, राजेश खंगारे, तुषार गायकवाड, मनोज बसवार, भगवान चांदेकर, मनोज कुहिटे, योगराज धानोरकर, गणपती पठाने, यशवंत पाटील, विनोद मानकर, योगराज धानोरकर, दादाराव लांजेवार, मदन मोरे, शांताराम ढोके, प्रकाश सनेश्वर, देविदास कळंबे, शेषराव वाढीकर, कैलास पाटील, धिरज राऊत, मंगेश धुर्वे, गेंदलाल खेकडे, भिम यदुवंशी, गजानन चौधरी, शुभम बन्सोड, वसंता भागवत, योगेश राऊत, रमश घावले, कांचन ढवंगाळे, सुधाकर ढोबळे, मदन मोरे, गजानन सोनबावणे, गजू चौधरी, पवन लांबट, धनेश्वर ढोके, प्रभाकर बरडे, लकी लाडसे, राजेश कमाले, आतीकषेक, राकेश कोल्हे, सौरभ मुळे, अभिषेक सोमकुवर, यशवंत पाटील सह अनेक पुरोगामी विचारधारेचे मान्यवर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.