spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर व विधानपरिषद सदस्य प्रा. संजय भेंडे यांचा सत्कार

नागपूर :- भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर आणि नवनियुक्त विधान परिषद सदस्य प्रा. संजय भेंडे यांचा भारतीय जनता पार्टी चे माजी प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी शॉल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

डॉ. उपेंद्र कोठेकर यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ विभाग संघटनात्मक जबाबदारी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे आणि प्रा. संजय भेंडे यांची देखील नुकतीच विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झालेली आहे. या दोन्ही निवडीबद्दल आनंद व्यक्त करीत भाजपा माजी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

याप्रसंगी विदर्भ विभाग कार्यालय प्रमुख संजय फांजे, प्रदेश आर्थिक प्रकोष्ठ संयोजक मिलींद कानडे, प्रा. श्रीकांत देशपांडे, किशोर रेवतकर, प्रदीप पडोळे, पू्र्व विदर्भ मिडिया संयोजिका कल्पना नळसकर , संजय पेशनें आदी उपस्थित होते.

प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर आणि आमदार प्रा. संजय भेंडे यांच्याकडे पक्षनेतृत्वाने दिलेली जबाबदारी म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, अशा शब्दांत ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, डॉ. कोठेकर यांनी सदैव पक्ष संघटन बांधणी आणि गोरगरिबांचे कल्याण यासाठी समर्पित भावनेने काम केले आहे. त्यांच्या या निवडीने पक्षामध्ये चैतन्याचे वातावरण असून त्यांच्या मार्गदर्शनात पक्ष संघटन अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रा. संजय भेंडे यांच्या रूपाने एक शांत, मनमिळावू आणि अभ्यासू आमदार नागपूर शहराला मिळाले आहेत, असेही ते म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.