– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अटूट आस्था की गौरव गाथा’ या भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार ११ मे २०२६ रोजी सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात पार पडणार आहे.
सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या या पर्वामध्ये भक्तीमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भक्तिमय गीत-भजन, ११ हजार ‘ॐ नमः शिवाय’ जप तसेच रुद्र अभिषेक यांचा समावेश असणार आहे. कार्यक्रमानंतर सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे राहणार आहेत. याशिवाय विशेष पाहुणे म्हणून राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनवर्सन निधी, न्याय व कामगार राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, खासदार माया ईवनाते, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने, आमदार संदीप जोशी, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार विकास ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित, प्र अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शना धवड, गांधीबाग झोनच्या सभापती उमा देशमुख, एमआयएमचे गटनेते शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेते असलम मुल्ला खान, शिवसेना (उबाठा) गटनेते किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटनेत्या आभा बिज्जू पांडे, बसपाच्या गटनेत्या हर्षला जयस्वाल, शिवसेना (शिंदे) गटनेते गणेश चर्लेवार, नगरसेवक सुधीर राऊत, नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण विशेष समिती सभापती सारिका नांदुरकर, नगरसेवक सचिन नाईक, नगरसेविका वैशाली उदापूरकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाकडे असून, उपायुक्त मंगेश खवले आणि क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.