खापा, वार्ताहर :- महसूल विभागाचे सर्व विभाग एकाच छताखाली आणून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित केलेले, राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा अंतर्गत खापा शहरात शुक्रवार (दि.८) मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ सहकार महर्षी बाबासाहेब केदार, सामूदायीक भवन, खापा येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिरात शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध दाखले व शासकीय सेवांचा लाभ घेतला.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार डहाट प्रामुख्याने उपस्थित होते. शासनाच्या विविध योजेनेबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात या शिबीरामध्ये एकूण ५५० लाभार्थ्यांना विविध शासकिय योजने अंतर्गत लाभ देण्यात येणार असून, या शिबीराचे वैशिष्ट्य म्हणजे शिबीराच्या पुर्वी गावात जावून नागरीकांचे अडचणी व अर्ज प्राप्त करून घेणे व त्यावर कार्यवाही पूर्ण करून शिबीराचे दिवशी त्यांना लाभ देण्यात आल्याचे सांगीतले. त्यांनी शिबीरामध्ये उपस्थित नागरीकांना व विविध विभागांचे अधिकारी यांना या शिबीरामधून जास्तीत जास्त लोकांना लाभ देता येईल. याकरीता शिबीरापूर्वी नियोजन करण्याबाबत निर्देश दिले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत शासनाने नियोजित केल्यानुसार तालुक्यातील ६ मंडळामध्ये १५ सेवांचे कामकाज होणार असल्याबाबत सांगून शासनाने अकृषक परवानगी रद्द केल्याबाबतची माहिती तसेच विकास परवानगी संदर्भातील माहिती व अकृषक आकारणी जमा करण्यासंदर्भातील माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी उपस्थित नागरिकांना दिली. तसेच आगामी दि. १५ मे, २०२६ रोजी सावनेर येथे घेण्यात येणाऱ्या शिबीराला मोठया संख्येने उपस्थित राहण्याबाबत विनंती केली.
सदर शिबीरादरम्यान विविध विभागामार्फत स्टॉल लावण्यात येवून नागरीकांच्या तक्रारी व अडचणीचे निराकरण करण्यात आले. तसेच विविध विभागामार्फत विविध योजनेचे अंतर्गत लाभ देण्यात आलेले असुन नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच विविध विभागाचे अधिकाऱ्यामार्फत शासनाचे विविध योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महसुल विभागामार्फत डिजीटल सातबारा-२१४, ८अ उतारा-८३, व इतर विविध प्रमाणपत्र १४७ लाभार्थ्यांना, भोगवटदार वर्ग-२ मधून भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करण्यात आलेले अद्यावत ३२ लाभार्थ्यांना ७/१२ निर्गमित करण्यात आले, जिवंत ७/१२ अंतर्गत ३३ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. पुरवठा विभागामार्फत एकूण ३२ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. संजय गांधी यांजने अंतर्गत १७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. २३ महसूली प्रकरणे निकाली काढुन अद्यावत ७/१२ निर्गमित करण्यात आले. तालुका कृषी विभागामार्फत ९ लाभार्थ्यांना तुषार सिंचन, ठिबक सिंचन, विद्युत पंप व गांडुळ खत बाबत योजनांचा लाभ देण्यात आले. सदर शिबीरादरम्यान एकूण ५५० लाभार्थ्यांना विविध योजने अंतर्गत लाभप्रदान करण्यात आले.
या शिबीरामध्ये तहसिलदार अक्षय पोयाम, खंड विकास अधिकारी मनोज हिरुळकर, उप अधिक्षक भुमी अभिलेख प्रमोद बोकडे, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे, महिला व बाल विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय चमु, पशुसंवर्धन अधिकारी, नायब तहसीलदार कैलास अल्लेवार, नायब तहसीलदार संजय अनवाने, खापा मंडळ अधिकारी राजेश घुडे यांच्यासह खापा मंडळातील सर्व ग्राम महसुल अधिकारी, पाठबंधारे विभाग, बस आगर व्यवस्थापक सेतु, आधार व ईतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित आणि मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. तसेच मुख्याधिकारी सचिन राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, नगराध्यक्ष पियुष बुरडे, उपाध्यक्ष सुनिल पाहूणे, नगरसेवक निखिल आष्टनकर, पुष्पेंद्र (मुन्ना) शर्मा तसेच इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.