spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एकल महिला धोरणासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण आवश्यक – महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई :- राज्यातील एकल महिलांच्या विविध प्रश्नांचा सर्वंकष विचार करून प्रभावी धोरण तयार करण्यासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण करणे आवश्यक असून, सध्या उपलब्ध असलेल्या सर्वेक्षणांचा उपयोगही धोरण निर्मितीसाठी करण्यात यावा, असे निर्देश महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिले.

निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली एकल महिला धोरणासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी धोरणाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महिला व बाल विकास राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांचा विचार करून धोरण अधिक परिणामकारक करण्यात यावे. यासाठी समितीमध्ये आणखी सदस्यांचा समावेश करण्यात यावा. तसेच राज्य शासनाचे विविध १३ ते १४ विभाग या विषयाशी संबंधीत असल्याने सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन समन्वयातून धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी.

एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, त्यांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात आणि धोरण राबविताना सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Popular Articles