spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मागील पाच वर्षांपासून थंडबसत्यात असलेल्या पाणी टाकी निर्मितीचे काम केव्हा पूर्णत्वास येणार – नगरसेवक अनिल सूर्यवंशी

कामठी :- उन्हाळा म्हटला की शहरात दरवर्षी पाण्याची टंचाई जाणवते व सर्वत्र पाणी मिळत नसल्याची ओरड सुरू होते या बाबी गांभीर्याने लक्षात घेता राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नातून कामठी नगर परिषदेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत प्रभाग क्र 4 येथील नागसेन नगर येथे पाणी टंकी निर्माण कार्याला सुरुवात झाली होती मात्र हे पाणी टंकी बांधकाम मागील पाच वर्षांपासून अर्धवट स्थितीत थंडबस्त्यात असून या टाकीजवळ परिसरातील कचरा व सांडपाणी जमा होत असल्यामुळे या दुर्गंधीने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. तेव्हा मागील पाच वर्षपासुन थंडबस्त्यात असलेल्या बांधकामाला लवकरात लवकर गती देण्यात यावी व या पाणीटाकी परिससरात नियमित साफ सफाई करावी या मागणीचे आशयाचे निवेदन नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांनी नगर परिषद मुख्यअधिकारी विनोद जाधव यांना दिले आहे.

याप्रसंगी कामठी नगर परिषद चे विरोधी गट नेता  काशीनाथ प्रधान, अलंकार गजभिए, नगर सेवक साजिद भाई, आशीष मेश्राम,सुमीत ठवरे, भूपेश चव्हाण,निलेश मेश्राम, शशांक चंद्रिकापुरे आदी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.