spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“खरीप हंगामाच्या तयारीसाठी पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शन”

– गाव अजनी ता. कामठी जि. नागपूर 

कामठी :- आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पाणी फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आजनी गावात मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जलसंधारण, मृदसंधारण, पिक नियोजन, कमी पाण्यातील शेती तसेच सेंद्रिय शेती पद्धती याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात बागडे उप कृषी अधिकारी कामठी व सुनील सुनील उज्जैनवार, सहायक कृषी अधिकारी अजनी यांनी सांगितले की, पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होते. तसेच शेततळी, नाला खोलीकरण, व वृक्षलागवड यांसारख्या उपाययोजनांमुळे खरीप पिकांना फायदा होतो.

यावेळी गावातील उमेश रडके, बळवंत रडके, पुंजाराम शेवाळे, अशोक चव्हाण, चुडामन वाणी, राजेश हरणे, ब्रिजेश हरणे, गजानन घोडे, रामेश्वर इंगोले, शेषराव पारेकर शेतकरी उपस्थित होते. पाणी फाउंडेशनच्या कार्यामुळे गावात गट शेती मुळे उत्पादनात सुधारणा होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी योग्य बियाणे निवड, खत व्यवस्थापन आणि तणनियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.