spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

– दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

– दहावी मध्ये १७ विधार्थ्यांचे ९०% पेक्षा अधिक गुण

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गजानन शिक्षण सेव संस्था हिवरी नगर नागपुर द्वारा संचालित प्रिआंती इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तरोडी (बु) शाळेची दहावी व बारावी परीक्षेत परीक्षेत १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आशिष तायवाडे Corporate Trainer, प्रा. अवंतिका  रमेश लेकुरवाळे अध्यक्ष श्री. ग.शि.से.स. तथा मा. सभापती म.बा.क. जिल्हा परिषद नागपुर, रमेश लेकुरवाळे सचिव श्री. ग.शि.से.संस्था,  सतिष बरडे,  संगीता भौयर, प्राचार्या नंदा ठाकरे, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या प्रथम क्र. साहिल जामगडे ९५.४० % द्वितीय क्र. सुयश डोंगरे ९४.२०% तृतीय क्र. अनुष्का पाटील ९४.००% तसेच १७ विध्यार्थी ९० % पेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आणि बारावीमध्ये प्रथम क्र. पार्थ धोटे, द्वितीय क्र. नेहा निकाळजे, तृतीय क्र. लावण्या नागमोते तसेच उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे संचालक मंडळ तसेच प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यातही असेच यश संपादन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.