spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्यार्थिनीने उचले टोकाचे पाऊल : घरीच घेतला गळफास

दहावीच्या परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने निराश झालेल्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना रामटेक तालुक्यातील शितलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत परसोडा येथील देशमुख ले आऊट (दि.१२) मे रोजी सकाळी १०.०० वा सुमारास घडली. कावेरी कमलाकर बोरसे असे मृत तरुण विद्यार्थिनीचे नाव आहे. मिळालेल्यामाहितीनुसार, दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे रामटेकात एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. कावेरी कमलाकर बोरसे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थीचे नाव असून ती प्रोव्हीडन्स इंग्लीश स्कूल मनसर येथे वर्ग १० ची विद्यार्थिनी होती. नुकताच वर्ग १० वी निकाल जाहीर झाला. त्यात तिला ७६ टक्के गुण मिळाले. पण गुण कमी मिळाल्याने ती नाराज होती. कावेरीचे वडील हे कामठी येथे मिल्ट्री मधे नोकरीत असून आई ही कृषी विभागात कृषी साहाय्यक महादुला परीसरात नोकरीला आहेत. कावेरीचे पालक सकाळी नोकरीवर निघुन गेले. तर कावेरीच्या दोन लहान बहिणी आपल्या मामाच्या गावाला गेल्या होत्या. त्यामुळे घरी ती एकटीच होती. घरीच तीने पंख्याला फास लावुन निराश झालेल्या विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवली. रामटेक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.