सावनेर बायपास ओव्हरब्रिजवर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन आणि सावनेर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले.
घटना अंदाजे दुपारी १२:३० वाजताची असून, सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना सावनेर पोलीस स्टेशनचे अंकुश मुळे यांनी माहिती दिली. माहिती मिळताच हितेश बनसोड आणि सावनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले.![]()
हितज्योती आधार फाउंडेशनच्या ॲम्ब्युलन्सच्या मदतीने दोन्ही जखमींना सावनेर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून हितेश बनसोड यांच्या मदतीने पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना केले.
जखमी हे MP 28 N 6820 क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या गावावरून नागपूर येथे कामासाठी जात होते.
गंभीर जखमींची नावे
गंभीर जखमी :विजय रामराव कावरे, वय 26 वर्षे
रा. घाट अमरावती, तालुका पट्टण, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश
गंभीर जखमी अजय देवराव दोडके, वय 28 वर्षे
रा. घाट अमरावती, तालुका पट्टण, जिल्हा बैतूल, मध्य प्रदेश
अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी सावनेर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचे संख्याबळ कमी असल्यामुळे वेळोवेळी अडचणी निर्माण होत असून, नागरिकांना आवश्यक मदत वेळेवर मिळत नाही, त्यामुळे सावनेर पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ वाढवावा अशी मागणी केली आहे.