Home Latest News अमृत 2.0अभियांनांतर्गत लोककलेच्या माध्यमातून जनजागृती

अमृत 2.0अभियांनांतर्गत लोककलेच्या माध्यमातून जनजागृती

0
3

कामठी :- महाराष्ट्र नगरविकास विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या अमृत 2.0अभियांनाच्या अंतर्गत मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनार्थ कामठी शहरात बस स्टँड , लोकवर्दळ ठिकानासह चौका चौकात लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

या लोककलेच्या माध्यमातून नागरिकांना ‘चला पाण्याला पुनर्जीवन देऊ यावं,अमृत 2.0सोबत जलसुरक्षित शहरे घडवू या’या संदेशाखाली पोवाडा, शायरी ,लोककला, आणि सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून जलसंवर्धन,पर्यावरण संरक्षण ,स्वछता आणि शाश्वत नागरी विकासाचे महत्व प्रभावीपणे मांडण्यात आले.

अमृत 2.0अभियान अंतर्गत 100 टक्के पाणी पुरवठा जोडणी ,जलस्रोतांचे पुनरुज्जीवन ,हरितक्षेत्राचा विकास ,सांडपाणी प्रक्रिया आणि मलनिस्सारण व्यवस्थेचे सुदृढीकरण यासारख्या महत्वपूर्ण उपक्रमांची माहिती नागरिक व विद्यार्थ्यांना देण्यात आली.आधुनिक आणि पर्यावरणपूरक शहर निर्मितीसाठी नागरिकांचा सहभाग किती आवश्यक आहे हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

‘पाणी वाचवा ,पर्यावरण जपा आणि स्वच्छतेला जीवनशैली बनवा हा संदेश देण्यात आला.

याप्रसंगी मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले की आजची युवा पिढी जागरुक झाली तर उद्याची शहरे अधिक सुरक्षित,स्वच्छ आणि विकसित बनतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला तसेच लोककलेच्या या प्रभावी माध्यमातून सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहचविणारे असे उपक्रम समाजजागृतीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत असून जनसहभाग ,जागरूकता आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावरच स्वच्छ हरित आणि जलसुरक्षित कामठी शहर घडविणे शक्य आहे ही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.