– 90 हजाराचा मुद्देमाल जप्त
– एक दिवसाची पोलीस कोठडी
कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याहद्दीतील पेठे लेआऊट संविधान चौक न्यू येरखेडा येथे एमडी पावडर (मादक द्रव्य पदार्थाची) तस्करी करताना तरुणास अटक करून 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई बुधवार ला रात्री बारा वाजता सुमारास नवीन कामठी पोलिसांनी केली नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांच्या आदेशानुसार ऑपरेशन थंडर अंतर्गत नवीन कामठी पोलीस न्यू येरखेडा येथे गस्तीवर असताना गुप्त माहितीच्या आधारावर आरोपी अजय राधेलाल सोनानी वय 28 वर्ष राहणार पेठे लेआउट संविधान चौक न्यू येरखेडा हा बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक एमएच ४९ डीवाय 3499 ने बुधवार ला रात्री अकरा वाजता सुमारास घराकडे परत जात असताना नवीन कामठी पोलिसांनी संविधान चौकात थांबवून तपासणी केली असता त्याच्या खिशात तीन ग्राम एमडी (मोफेड्रोन ड्रग्स) मादक पदार्थ मिळून आले त्याची किंमत तीस हजार रुपये ,एक मोबाईल फोन व बजाज पल्सर मोटरसायकल किंमत 50 हजार रुपये एकूण 90 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला नवीन कामठी पोलीस स्टेशनला कलम 8 (क), 22 (ब), एनडीपीएस ऍक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी अजय राधेलाल सोनानी वय 28 वर्ष यास अटक केली त्याला कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे त्यामुळे त्याने एमडी पावडर मादक पदार्थ कोणाकडून विकत आणले व कोणाला विकणार होता या संदर्भात योग्य चौकशी करून संबंधित इतर आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले आहे वरील कारवाई पोलीस उपायुक्त डॉ निखिल पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर ,नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव, भानुदास गीते ,पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे, किशोर महनत, श्याम गोरले ,नसीम अन्सारी ,मिथुन सेंन्द्रे यांच्या पथकाने केली.