spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी शहरात गांजा, एमडी,ड्रग्जचे सेवन व विक्री करणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय

संदीप कांबळे,कामठी :- कामठी शहरात गांजा,चरस, एमडी सारखे व अंमली पदार्थ गुप्तचर पद्धतीने सहजरित्या मिळू लागल्याने पालक वर्गातुन चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा पोलिसांनी नुसत्या ऑपरेशन थंडर सारख्या मोहिमे पर्यंतच कारवाहीचा देखावा करून मोकळे होण्यापेक्षा या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शहरातील गांजा व एम डी ,ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी पालकवर्ग करीत आहेत. नशेच्या विळख्यात बहुतांश तरुणाई अडकली असून शिरकाव झालेल्या घातक एमडी,ड्रग्ज कडे तरुणाईचा चांगलाच कल वाढला आहे.ही सत्यता पोलीस नाकारू शकत नाही कारण खुद्द जुनी कामठी व नविन कामठी पोलिसांनी एमडी तस्कर प्रकरणात कारवाही केल्या आहेत. कमी वेळेत जास्त पैसे कमविण्याची लालच काही अवैध व्यावसायिकांची गांजा व एम डी ड्रग्ज विक्री करणाऱ्या पर्यंत गेली आहे.कामठी शहरात्त गांजा तेलांगणातून तर एम डी ड्रग्ज मुंबई वाया नागपूर हुन कामठीत येत आहे.तसेच जनावरांच्या वाहनाची पायलाटिंग करणारे काही तस्कर रात्र भर एम डी ड्रग्ज चे सेवन करून राहत असल्याचे बोलले जाते.

सध्या शहरात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग सह युवतीना सुद्धा एम डी ची लत लागली आहे अंमली पदार्थाच्या तुलनेत एमडी ड्रॅग्ज पावडर अतिशय नशा देणारे आहे ज्याची नाळ मुंबई,भिवंडी पासून कामठीत जुळली आहे.कामठीत अवैधरित्या विकणारे हे ड्रग्ज टॅबलेट आणि पावडर या दोन्ही स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जात असून युवापिढी घातक नशेच्या आहारी जात आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.