spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

 “मधुकर अभ्यासिका” येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती व विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न

कामठी :- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे पावन औचित्य साधून, भारतीय उत्कर्ष मंडळ, खापरी द्वारे संचलित आणि संघ मैदान, मोदी पड़ाव येथील पूजनीय बाळासाहेब देवरस स्मृती “मधुकर अभ्यासिका” मध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शौर्याचे प्रतीक असलेल्या संभाजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्या आदर्शांवर प्रकाश टाकण्यात आला.

याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला परिसरातील सुमारे २०० नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पूज्य प्रवराजिका ईशात्मा प्राणा माताजी (श्री रामकृष्ण सारदा मिशन स्कूल ऑफ होमसायन्स) आणि पूज्य ब्रह्मचारिणी कावेरी श्री रामकृष्ण सारदा मिशन स्कूल ऑफ होमसायन्स, कामठी कॅन्टोन्मेंट) उपस्थित होत्या. तसेच, कामठी जुने पोलीस स्टेशनचे माननीय पोलीस निरीक्षक प्रशांत जुमळे आणि दुर्गा चौक निवासी तथा नगर संघचालक मुकेश चकोले यांनी आपल्या गरिमामयी उपस्थितीने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

सन्मानित गुणवंत विद्यार्थी:

या सोहळ्यात शाक्यान गोरे, रोशन घोटेकर, ओम मरचट्टीवार, अल्पेश रंगारी, जय यादव, देवांश कातोरे, आर्या चकोले, प्रगती आले, मोहिनी गंधेवार, धनश्री आंबटकर, कृतिका काटरपवार, कांचन पारलेकर, वंशिनी सेटपेट, जुनेरा, हर्षाली मानवटकर, तेजस दुरबुडे आणि शिवम अग्रवाल या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव शर्मा यांनी केले. मधुकर अभ्यासिकेचे संचालक आयुष भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आंचल अग्रवाल, हर्ष रापर्तीवार, हितेश अग्रवाल, रोहित ठाकूर, आदित्य बाहे, शौर्य श्रीवास, रौनक तालेवार, आनंद अग्रवाल, कल्पेश, वैभव आणि इतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेवटी, उपस्थित सर्व नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचा संकल्प केला.

Popular Articles