सावनेर :- सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील वकील–परसोडी रोडवरील दूधबडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
मृतकाचे नाव सचिन दशरथ चचाने (वय ४५) असे असून ते डोरली भिंगारी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर येथील रहिवासी होते. ते आपल्या मोटारसायकलने (क्रमांक MH 40 Q 6792) जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तत्काळ सावनेर पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना दिली. तसेच हितेश बनसोड यांच्या मदतीने जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, सावनेर येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी सावनेर पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.