कन्हान २५ : – माँ शारदा मंडळ खंडाळा (घटाटे) द्वारे कवडु मुंडेले वस्ताद यांच्या गुरूपुजे निमित्य डहाका मंडळ व कलाकार मेळावा कार्यक्रम बुधवार (दि.२३) जुलै रोजी सेवकराम नेवारे यांचा निवस्थानी मोठ्या उत्साहाने पार पडला.
डहाका व मेळाव्यात आजु बाजुच्या गावातील अनेक ग्रामिण लोक कलावंत आणि कलाकार बांधवां नी आपल्या डहाका व पोवड्याचा माध्यमातुन कल्या कौशल्याचे प्रदर्शन सादर केले. कार्यक्रमाचे आयोजक राजीव कवडु मुंडले, हुकुमचंद ठाकरे, सेवकराम नेवारे, नरेश राऊत, स्वप्निल ठाकरे, अरविंद हटवार यांनी केले . याप्रसंगी शाहिर विक्रम वांढरे, शालिक शेंडे, कुमार सूरज नवघरे, कुमार दीलेर पाहुणे, धनराज मोहोड, श्रीहरी मोहोड, प्रकाश पाहुणे, बाळाजी बावणे, राजेंद्र लक्षणे, रविंद्र दुपारे, धर्मदास आपुरकर, भाऊराव कोचे सह ग्रामिण लोककलावंत आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
माँ शारदा मंडळ खंडाळा (घटाटे) द्वारे डहाका व कलाकार मेळावा









