spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सुदर्शन नगर येथे शॉर्टसर्किट मुळे घराला आग

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सुदर्शन नगर येथील संजू सकतेल व बबलू सकतेल यांच्या घराला आज दुपारी 1 दरम्यान आग लागल्याची घटना घडली असून आग लागल्याचे कारण शॉर्टसर्किट सांगण्यात येते. घटना घडताच घरसदस्यांची एकच तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वेळीच नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी सहकाऱ्यांसह मदतीची धाव घेत आग आटोक्यात आणण्यात यश गाठले.या आगीत घरसाहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी सकतेल कुटुंबियांचे मनधरणी करीत लवकरात लवकर नुकसान भरपाई करण्याचे आश्वासीत केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.