कामठी :- कामठी तालुक्यातील चिकना बोरगाव येथील उत्तम बंगाळकर यांच्या मालकीच्या शेतात बांधून असलेल्या एका बैलावर वाघाने हल्ला करून जीवानिशी ठार केल्याची घटना गतरात्री 2 च्या सुमारास घडली.या घटनेत जवळपास 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच भाजप पदाधिकारी किशोर बेले यांनी त्वरित पुढाकार घेत तहसिलदार यांना माहिती दिली.दरम्यान संबंधित पशुधन विभागाने पंचनामा केला.या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
वाघाच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.