spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गो-विज्ञान केंद्राला राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित..

– गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान 

सचिन चौरसिया, रामटेक :- गोसेवा हीच खरी देवपूजा मानून गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांच्या मार्फत विविध प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील लोकांना मिळवून दिलेला रोजगार निर्मितीच्या कार्याची दखल घेत, गोव्यातील पणजीत नुकतेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता यांच्या नेतृत्वात देवलापार येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत. दूरदृष्टी, धाडसी निर्णयक्षमता आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण यांचा संगम असलेले प्रख्यात उद्योगपती म्हणून पदमेश गुप्ता ओळखले जातात. यापूर्वी त्यांना गोवत्स ही मानाची उपाधी संतांनी प्रदान केली आहे. नुकतेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन पणजी गोव्यात झाले. याच सोहळ्यात गो-सेवा कार्यासाठी देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता यांना गो-सेवा कार्यासाठी राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ प्रदान केला. हा पुरस्कार त्यांच्या वतीने अनुराग गुप्ता आणि गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी स्वीकारला. एकंदरीत पाहता ‘गोरक्षणी स्वरक्षण ऐसे पूर्वजांचे कथन’ अशा स्वरूपात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेला उपदेश प्रत्यक्षात अमलाखाली आणण्याचे कार्य पद्मेश गुप्ता यांच्या नेतृत्वात गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने आणावा, ही बाब नक्कीच गौरवपूर्ण ठरली आहे. याप्रसंगी गोव्याचे समजकल्याण मंत्री सुभाष फलदेसाई डिजिटल मिडीया संघटनेचे अध्यक्ष राजा माने आणि डॉ. ओमप्रकाश शेटे, अध्यक्ष, आयुष्मान भारत आरोग्य योजना – महाराष्ट्र राज्य, तसेच देशभरातून सुमारे ४०० डिजिटल मीडिया पत्रकार उपस्थित होते.

गायीची सेवा करणारे भाग्यवान असतात. गो-विज्ञान केंद्रामार्फत आम्ही जे प्रकल्प राबवित आहोत, ते सर्व समाजहिताचे आणि गोधनाचे संरक्षण करणारे आहे. महाराणी दुर्गावती ग्रामीण हाट हा प्रकल्प तर हटके राहील अन् आदिवासी बांधवांना कला जोपासून रोजगार मिळविता येईल. अशीच सेवा आपण अविरतपणे करीत राहणार असल्याचे गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता यांनी सांगत गो-सेवा पुरस्कारासाठी निवड करणाऱ्यांचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक आभारही पद्मेश गुप्ता, अध्यक्ष, गो- विज्ञान अनुसंधान केंद्राचे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.