spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

कन्हान :- काली माता मंदिर काली घाट येथिल कन्हा न नदीचे पात्रात एका अनोळखी इसम पाण्यात बुडुन मरण पावल्याचे आढळुन आल्याने कन्हान पोलीसानी घटनास्थळावरून मुतदेह पाण्या बाहेर काढुन उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे उत्तरिय तपासणी करिता नेऊन कन्हान पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवार (दि.१७) मे २०२६ ला दुपारी १.१७ वाजता काली माता मंदिर काली घाट येथे कन्हान नदी चे पात्रात एक पुरुष पाण्यात तरंगताना दिसल्याची कन्हान पोलीस स्टेशन ला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले तर नदीचे पात्रात् एक पुरुष इसम पाल्थ्या स्थितित दिसुन आल्याने पोलिस मित्र अनिल आंबिलढुके यास बोलावुन त्याचे मदतीने बाहेर काढुन तेथिल खडकावर ठेवले तर इसम हा मरण पावलेला दिसल्याने तेथिल लोकाना यास ओळखता का ? अशी विचारपुस केले तर कोणीही ओळखत नसल्याचे सांगि तले. त्या अनोळखी इसमाचे अंदाजे वय ६५ वर्ष असुन वर्णन ऊंची ५.५ इच, केस काळे, दाढी वाढलेली पांढरी , त्याचे अंगात कपडे घातले नव्हते. तसेच डावे पायावर निळा रंगाचा पॅन्ट अटकुन होता. दोन पंचासमक्ष घटना स्थळी पंचनामा करित सदर इसमास पोलिस मित्र तथा समाजसेवक अनिल आंबिलढुके याच्या टाटा एस क्र. एमएच ४० सी एम ७४२७ या चारचाकी वाहनाने उप जिल्हा रूग्णालय कामठी येथे नेले तर डॉक्टरानी तपा सुन मृत घोषीत केल्याने त्या अनोळखी मुतदेहाला उत्तरिय तपासणी करिता मच्यूरीत शीतपेटीत ठेवले. पोलिस स्टेशन कन्हान ला परत येऊन फिर्यादी सरकार तर्फे पोहवा रोशन ज्ञानेश्वर देवतळे पोस्टे कन्हान यांचे लेखी तक्रारीने पोलीसानी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.