कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या नेरी(उनगाव) ग्रामपंचायत चे माजी सरपंच अरुण गोपीचंद आखरे यांनी ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीच्या कोणत्याही पदावर कार्यरत नसताना व त्यांना कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना तसेच विद्यमान सरपंचच्या कार्यकाळातील कोणताही अधिकृत ठराव किंवा त्यांची परवानगी न घेता 23 नोव्हेंबर 2024 रोजी माजी सरपंच अरुण आखरे यांनी स्वतःची स्वाक्षरी करून कार्यालयीन जावक क्र 78 अनव्ये चिंतेश्वर स्टील प्रा ली कंपनी उनगाव यांचे नावे बनावट ना हरकत प्रमाणपत्र तयार करून त्याचा बेकायदेशीर वापर केला आहे.यासंदर्भात फिर्यादी विद्यमान सरपंच सुजाता सुरेश पाटिल वय 34 वर्षे रा होळी चौक नेरी उनगाव ने नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी माजी सरपंच अरुण गोपीचंद आखरे वय 56 वर्षे रा नेरी उनगाव विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 336(4), 340 (2)अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप भिताडे करीत आहेत.
नेरी ग्रामपंचायत च्या माजी सरपंचा विरोधात बनावटीचा गुन्हा दाखल
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.