कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड रोड वरील प्रिया सुशांत चौरे यांच्या घरी कुणी नसल्याचे संधी साधून अज्ञात चोरट्याने दिवसा ढवळया घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात अवैधरीत्या प्रवेश करून बेडरुम च्या ड्रॉवर मध्ये गुल्लक मध्ये ठेवलेले नगदी 8 हजार रुपये व सोन्या चे दागिने असा एकूण 77 हजार रुपयेचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजता निदर्शनास आली यासंदर्भात फिर्यादी प्रिया सुशांत चौरे वय 38 वर्षे रा घोरपड रोड, मढी मंदिर जवळ कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी त्यांचे माहेरी शहापूर जिल्हा भंडारा येथे आज दुपारी 4 वाजता गेल्या होत्या ही संधी साधून अज्ञात चोरट्याने चोरी करण्यात यश गाठले.
77 हजार रुपयांची घरफोडी
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.