कामठी :- राज्याचे महसूल व नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थानिक निधीतून घोरपड –शिरपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत घोरपड –शिरपूर येथील १० दिव्यांग लाभार्थ्यांना ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले घोरपड ग्रामपंचायत च्या सरपंच तारा बलवंत कडू ,उपसरपंच अनिकेत वानखेडे ,ग्रामविकास अधिकारी शाम उचेकर ,कुणाल कडू, ग्रामपंचायत सदस्य गीता पांडे ,सुनीता कार्वेकर, प्रकाश खांडेकर यांचे हस्ते घोरपड येथील दिव्यांग लाभार्थी पुनम कारवेकर, अनिता ढोक ,अशोक गजबे, सुरज हटवार ,कुणाल जुबळे ,राहुल चौधरी ,शालिनी ठवरे ,हिमांशू खराबे ,मदन ढोणे ,अरुण पांडे या सर्व दिव्यांगांना ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले सर्व लाभार्थ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सरपंच तारा कडू यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कुणाल कडू यांनी केले.
घोरपड ग्रामपंचायत च्या वतीने दहा दिव्यांग लाभार्थ्यांना ट्रायसिकलचे वितरण
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.