spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुर्बल घटक समिती सभापती हत्तीठेले यांनी स्विकारला पदभार

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या दुर्बल घटक समिती सभापती लक्ष्मी हत्तीठेले यांनी शुक्रवार (ता.22) त्यांच्या सभापती पदाची सूत्रे स्वीकारली.

मनपा मुख्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी स्थायी समिती सभापती विरेंद्र (विक्की) कुकरेजा, यांच्यासह इतर नगरसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी समिती सदस्य योगेश पाचपौर, किरण मनपिया, तुषार लारोकर, योगेश मडावी, अमोल श्यामकुळे, मनीष बनसोड, विवेक निकोसे, सरस्वती सलामे वर्षा डोंगरे, दुर्गेश्वरी कोसेकर यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी झोनल सभापती, विशेष समिती सभापती यांच्यासह नगरसेवक व मनपाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles