spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी तहसील कार्यालयात महिलेची 15 लक्ष 7 हजार रुपयाने फसवणूक

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी तहसील कार्यालयात वडिलांच्या नावे असलेले शेत स्वतःच्या नावावर करण्यासाठी गेलेल्या महिलेला आरोपीने मी तहसील कार्यालय मध्ये काम करतो असे भासवून त्या महिलेला विश्वासात घेऊन महिलेकडून नगद व ऑनलाईन स्वरूपात 15 लक्ष 7 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी पीडित महिलेने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी स्वप्नील क्षीरसागर वय 35 वर्षे रा निमखेडा विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316(2),318(4)अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास तिडके करीत आहेत. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार कामठी तालुक्यातील खैरी रहिवासी मेघा रितेश धोपटे ह्या त्यांच्या वडिलांचे नावावरचे असलेले शेत स्वतःच्या नावावर करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 12 दरम्यान कामठी तहसील कार्यालयात गेले असता सदर आरोपीने त्या महिलेशी तहसील कार्यालयातच भेट गाठून मी तहसील कार्यालयातच काम करतो हे काम मी करून देतो असा विश्वास देऊन फिर्यादी कडून वेळोवेळी नगद व ऑनलाईन पद्ध्तीने पैश्याची मागणी केली मात्र दोन वर्षे लोटूनही काम न होता उलट पैस्याची उकळण सुरू आहे तेव्हा यासंदर्भात शहनिशा केली असता सदर आरोपी हा तहसील कार्यालयात कुठल्याही नोकरीवर नसून आपली फसगत झाल्याचे निदर्शनास येताच स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.