– मुख्यमंत्री हयाना तहसिलदार मार्फत रामटेक विधानसभा युवक कॉग्रेस चे निवेदन.
कन्हान :- रामटेक विधानसभा युवक काँग्रेस तर्फे देश भरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणा ऱ्या नीट पेपर फुटी प्रकरण विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासावर आघात करणारे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई कर ण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही याची शासनाने हमी घ्यावी. तसेच अशा प्रकार च्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय योजना कराव्यात. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना तहसिलदार यांचे मार्फत देण्यात आले.![]()
देशातील लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेची तयारी अत्यंत मेहनत व प्रामाणिकपणे करतात. मात्र, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी व गैरप्रकारांच्या बातम्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये तीव्र संताप, संभ्रम व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या घटना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या असुन शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करणा ऱ्या आहेत. यास्तव स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता, निष्पक्षता व समान संधी हे मूलभुत तत्त्व जपणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पेपरफुटी व परिक्षा प्रक्रियेतील गैरव्यवहारांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असुन त्यांच्या परिश्रमांचे अवमुल्यन होत आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची उच्चस्तरिय निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधित सर्व दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यास आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्या. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडु नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्या आणि विद्यार्थ्याच्या परिश्रमांवर अन्याय होणार नाही याची शासनाने हमी द्यावी.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी अजय चिकारा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष मा. शिवराज मोरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनुराग भोयर, नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस प्रभारी रौनक चौधरी, निखिल वानखेडे, नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष मिथिलेश कान्हेरे यांच्या मार्गदर्शनात तसेच रामटेक विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल दा. पाटील व नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव भोयर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पारशिवनी तहसिलदार सुरेश वाघचौर यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी युवक काँग्रेस नागपुर जिल्हा ग्रामीण माजी महासचिव सचिन सोमकुवर, युवक कॉग्रेस रामटेक विधानसभा उपाध्यक्ष आयुष मानकर, रामटेक विधानसभा महा सचिव महेश धोंगडे, युवक काँग्रेस चे गौतम पाटील, राहुल चाफले, आर्यन गजभिये, कल्पक मुलतेली, जय ढोबळे, शुभम वाघमारे, प्रज्वल मेश्राम, मयुर साबरे, तसेच युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.