कन्हान :- नगरपरिषद कन्हान पिपरी आणि समता सांस्कृतिक व शैक्षणिक बहूउद्देशीय संस्था कन्हान द्वारे समता बौध्द विहार रायनगर कन्हान येथे संपन्न होऊन या योजनेचा नागरिकाना लाभ घेण्याकरिता आयुष्मान भारत आरोग्य योजना कार्ड तयार करून देण्यात आले .
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबीर नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्या अध्यक्षेत तर उपाध्यक्ष रिंकेश चौरे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.आयुष्मान भारत ही योजना भारत सरकारची आरोग्य योजना असुन योजने अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो. यात सरकारी आणि अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार करता येतात. मुख्य फायदे असे आहेत की, ५ लाखां पर्यंत आरोग्य विमा, मोफत ऑपरेशन, तपासण्या आणि दवाखान्याचा खर्च भारत भरातील इनपॅनल्ड रुग्णालयात उपचार, आधीपासुन असलेले आजारही कव्हर होते. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही कव्हर करते, गरीब व गरजु कुटुंबे एसइसीसी २०११ यादीतील नागरिक, काही शहरी कामगार वर्ग, ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकाना आधार पडताळणी करून आयुष्मान कार्ड मिळवावा लागतो. आयुष्मान कार्ड घेऊन पँनल च्या दवाखान्या मध्ये जा आणि आयुष्मान मित्रा कडे कार्ड दाखवावा लागतो. अशी माहिती नगराध्यक्ष मा. राजेंद्र शेंदरे हयानी उपस्थिताना दिली. याप्रसंगी नगरपरिषद कन्हान-पिपरी उपाध्यक्ष रिंकेश चवरे, नगरसेविका प्रियंका विजयसिंग बैस (हटवार), आशा वर्कर वंदना शेंडे, किरण लेंडे (कुंभलकर), अंगणवाडी सेविका लता रोकडे, वासुदेव नाईक, मयुर हटवार, धीरज नाईक, लक्की ठाकुर, आकाश ठमके, मयुर डफरे सह रायनगर येथील नागरिक उपस्थित होते.