spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सेवेचा प्रवास थांबत नाही: भाजपचे मावळते मौदा –  तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल

किशोर साहू, मौदा :- मागील वर्षी एप्रिल 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने व महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौदा भाजपा तालुका मंडळ कार्याध्यक्ष पदावरून अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. सोमवार (ता.18 मे2026) ला सुमारे 13 महिन्यानंतर कोदामेंढी सर्कलचे क्लस्टर प्रमुख माजी सरपंच भगवान बावनकुळे यांची मौदा तालुका भाजप मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मौदा तालुका भाजपा मंडळ अध्यक्ष पद नसले तरी सेवेचा प्रवास थांबत नसल्याचे मावळते भाजपा तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी अध्यक्षपदाच्या कार्यभार सोपवण्यापूर्वी वार्तालाप करताना सांगितले.

वार्तालाप करताना ते पुढे म्हणाले की, या 13 महिन्यांचा प्रवास माझ्यासाठी केवळ पदाचा नव्हता, तर कार्यकर्ते, जनसामान्य आणि पक्षाशी अधिक घट्ट नाळ जोडणारा होता.

या काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी शक्य तितकं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या प्रवासात अनेकांचे प्रेम, सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं, त्याबद्दल मी मनःपूर्वक ऋणी आहे.भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व, चंद्रशेखर बावनकुळे , सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मनापासून आभार.

पद येतात-जाता राहतात, पण पक्षाने दिलेली संधी, कार्यकर्त्यांचे प्रेम आणि पालकमंत्री बावनकुळे यांच्या शब्द माझ्यासाठी नेहमीच सर्वोच्च राहील.काम करायचं असतं तर शेवटी पक्ष आदेश आणि पक्षनिष्ठा हेच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. पुढेही पक्ष जो आदेश देईल, त्या प्रत्येक जबाबदारीसाठी मी कायम तत्पर राहील.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.