spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विश्वशांतीसाठी श्री जागृतेश्वर देवस्थानात रुद्राभिषेक संपन्न

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त जागृतेश्वरात झाला शिवभक्तीचा जागर !!

नागपूर :- केंद्रीय मंत्री विकासपुरुष नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भारतावरील सद्यस्थितीत असलेल्या संकटाच्या निवारणार्थ विश्वशांतीसाठी आध्यात्मिक आघाडी, जागर भक्तीचा आयोजन समिती आणि जिजाऊ लोकसेवा प्रतिष्ठान मध्य नागपूर द्वारे श्री जागृतेश्वर देवस्थान, जागनाथ बुधवार येथील मंदिरात भगवान शंकराला शिवमहिमनाद्वारे रुद्राभिषेक, शिवलिंगाचे पूजन आणि महाआरती आदी कार्यक्रमाचे आयोजन भाजप महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचे प्रमुख उपस्थितीत सोमवारी संपन्न झाले.

वेदमूर्ती दीपक पाठक यांचे पौरोहित्याखाली सकाळी ८.३० वाजता रुद्राभिषेकाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका रेखा निमजे यांनी केले असून यावेळी नगरसेवक हेमंत बरडे, आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष डॉ श्रीरंग वराडपांडे, गिरीधारी निमजे प्रामुख्याने उपस्थित होते. शिवभक्तांनी अभिषेकनंतर भगवान शंकराची शेज व मंगल आरती करून भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सीमा सराफ, सुजाता खांबता, दर्शना नखाते, सुजाता कठवते, ज्योती हराड, अभिजित काठाले, स्वप्नील घाटोळे, अश्विन निमजे, कृष्ण डोमके, आदींचे सहकार्य लाभले.

Popular Articles