spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वातंत्र्य संग्राम सेनानी भैय्याजी भुते स्मृती सेवा संस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न

नागपूर :- स्वातंत्र्य संग्राम सेनानी भैय्याजी भुते स्मृती सेवा संस्था दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा सिनियर भोसला पॅलेस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दिनदर्शिकेचे प्रकाशन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्रंबकेश्वर प.पू.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मध्यप्रदेशचे कॅबिनेट मंत्री संपतिया उईके, श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (पंचम), दिगंबर आखाडा महामंडलेश्वर स्वामी अजय रामदास महाराज, श्रीमंत राजे जानोजी भोसले महाराज तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. निखिल भुते उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. या दिनदर्शिकेत संपूर्ण सण, समारंभ व तिथींची उपयुक्त माहिती देण्यात आली असून ती सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले. तसेच संस्थेमार्फत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व स्वातंत्र्य संग्राम सेनानी भैय्याजी भुते स्मृती सेवा संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles