spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाकी डोहात बुडून आणखी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू

– आणखी किती परिवार उद्धवस्त करणार हा वाकीचा डोह

खापा, वार्ताहर :- खापा पोलीस स्टेशन हद्दीतील वाकी नदीतील डोहात बुडून आणखी एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. २५ मे) रोजी घडली. तर एक तरुण सुखरूप बचावला. दीप रवि छेवले (वय १५ वर्ष), नयन सुनील ठाकूर (वय १५ वर्ष), प्रणय परमेश्वर सोनकुसळे (वय २५ वर्षे), पियूष नारायण भुरे (वय २४ वर्षे) सर्व रा. लालगंज, इतवारी, नागपूर येथील रहिवासी आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघेही मित्र पिपळा डाक बंगला येथे पियूषच्या आत्याकडे आले होते. तेथून दुपारी तीन वाजता वाकी येथे नदीत मौज मजा करण्यासाठी गेले. या तापत्या उन्हात तिघांना पाण्याचा मोह आवरला नाही. म्हणून दीप, नयन, पियूष नदी पात्रात आंघोळीसाठी गेले. प्रणय हा बाहेर नदीकाठी होता.

यादरम्यान सायंकाळी पाच वाजता दीप हा पाण्यात बुडाला. दीपला वाचवण्यासाठी पियूष आणि त्याच्या मित्रांनी दुपट्टा बांधून पाण्यात उतरून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण वाचवू शकले नाही. या घटनेची माहिती वाकीस वाकी पोलीस चौकी येथे दिली. वाकी पोलीस चौकीतून खापा पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पीएसआय जगदीश पालीवाल हे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, पण रात्र झाल्यामुळे मृतदेह शोधण्यात अपयश आले. घटनास्थळावर सकाळी सहा वाजता शोध मोहीम पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेमुळे तिघेपण घाबरले आणि सहा वाजता तिघेही वाकी नदीपात्रातून परत नागपूरला गेले. घरी गेल्यावर दीपच्या घरी गेले आणि त्याच्या आईला घटनेची माहिती दिली. दीपच्या नातेवाईकांनी खापा पोलीस स्टेशन गाठले. खापा पोलिसांनी त्यांना सांत्वना देत शोधमोहीम सुरू असल्याचे सांगितले. घटनेचा तपास ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय जगदीश पालीवाल, हवालदार प्रकाश नांदुरकर, पोलिस शिपाई निलेश गावंडे, दशरथ पाटील यांनी केला. पुढील तपास खापा पोलीस करत आहे.

“एक वर्षा अगोदर हरविले होते वडिलाचे छत्र, एकट्या आईने आता कसे जगावे असा मोठा प्रश्न”

पियुषाचे वडील हे एक वर्षा अगोदर मरण पावले. आई ही जे भेटले ते काम करीत घर सांभाळायची. दीप हा एका खाजगी दुकानात काम करून आईला सहकार्य करायचा. या घटनेमुळे त्याच्या आईचा जीव हा कासवासा झाला आहे. आता त्या आईने एकाकी पणात कसे जीवन घालावे असा मोठा प्रश्न तिच्यापुढे उभा झालेला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.