spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हलबा समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन 20 जून रोजी

नागपूर :- हलबा समाज महासंघ दीनदयाल नगर नागपूरच्या वतीने हलबा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू घटकांसाठी निःशुल्क सामूहिक विवाह सोहळा 20 जून 2026 रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वर – वधू हिंदू विवाह पद्धतीनुसार विवाह लावण्यात येणार असून हलबा समाज महासंघाच्या तयार केलेल्या अटी व सर्व विधी नियमानुसार पार पडतील. या संपूर्ण विवाह सोहळ्याला खर्च जेवण नवरी नवरदेवाचे कपडे संपूर्ण तसेच भेटवस्तू इत्यादी हलबा समाज महासंघाकडून पूर्णपणे निशुल्क करण्यात येणार आहे महासंघात उपलब्ध जागेनुसार प्रत्येक जोडप्याला, 50 वराडी नवरीकडील 25 व नवरदेवाकडील 25 आणण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमाचा लाभ समाजातील जास्तीत जास्त मोठ्या संख्येने व गरजू कुटुंबीयांनी घ्यावा. असे आवाहन हलबा समाज महासंघातर्फे करण्यात आले आहे. असे अध्यक्ष देवराव नंदनवार आणि महासचिव रमेश पराते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Popular Articles