spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जनगणना व एसआईआर कामासाठी नियुक्त शिक्षकांच्या विमा कवचासाठी खासदारांना साकडे

– शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांची खासदार श्यामकुमार बर्वे यांच्याकडे मागणी

कन्हान :- विदर्भ प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघ नागपुर विभागाच्या वतीने रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांची शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि. २६) मे रोजी जनगणना व एसआईआर कामासाठी नियुक्त शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यापुर्वी रविवार (दि.२४) ला  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांनाही रामगिरी या शासकीय निवासस्थानी भेटुन निवेदन दिले.

प्रमुख मागण्या १) जनगणना व ‘एस आई आर’ साठी नियुक्त शिक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच लागु करण्यात यावे. २) प्रखर उन्हाळा व प्रतिकुल हवामानामध्ये मैदानी कामाचे वेळापत्रक आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने निश्चित करावे. ३) शिक्षकां वर जनगणना व ‘एस आई आर’ कामामुळे वाढणारा प्रशासकीय ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळा ची नियुक्ती करण्यात यावी. ४) जनगणना व ‘एस आई आर’ साठी नियुक्त शिक्षकांना त्यांनी सुट्टी कालावधीत केलेल्या दिवसाइतक्या किमान ४५ दिवस विशेष रजा खाती जमा करण्यात यावी. ह्या व इतर मागण्यांबाबत खासदार साहेबां सोबत सकारात्मक चर्चा झाली. या शिष्टमंडळात विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, उच्च माध्यमिक विभागाचे प्रा हरिष पोटभरे, नागपुर विभागीय सचिव खिमेश बढिये, टिईटी जिल्हा संघटक भिमराव शिंदेमेश्राम, ग्रामीण जिल्हा संघटक गणेश खोब्रागडे, पारशिवनी तालुका संघटक नरेश तेलकापल्लीवार, जिल्हा माध्यमिक संघटक शेषराव खार्डे, नागपुर शहर संघटक विवेक ढोबळे, नागपुर शहर संघटक समीर काळे, माध्यमिक संघटक राजेंद्र सुरजुसे, प्रमोद धोटे सह इतर शिक्षक सहभागी होते.

Popular Articles