किशोर साहू: मौदा, ता. २६ : ग्रा. पं. खात कार्यालयात बुधवार (दि.23 जुलै) ला उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये भाजपा शिवसेना युती चे रविन्द्र मंडारकर यांचा 8 विरुद्ध 4 असा विजय झाला. त्यामुळे त्यांची खात ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदावर निवड करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मौदा मुकेश अग्रवाल, माजी जि.प. सदस्य नागपूर राधा मुकेश अग्रवाल, सरपंच ग्रा. पं.खात माधुरी कैलाश वैद्य, माजी सरपंच कैलाश वैद्य, नीलकंठ गिरीपूंजे, माजी उपसरपंच तथा सदस्य कांचन पांडुरंग देवतारे, ग्रामपंचायत सदस्यगण अरविंद तांबूलकर, प्रियंका राजेश आंबिलढुके, बबीता सिद्धार्थ खोब्रागडे, निर्मला सुशील मेंढे, तुलसा गणेश ढोलवार, माजी ग्रा प सदस्य हरिभाऊ वैद्य, खात भाजपा अध्यक्ष राजेश गुड्डू गिरीपूंजे, माजी उपसरपंच शंकर वैद्य, महादेव ढवळे, संतोष गिरीपूंजे, भोजू आंबिलढुके,पुंडलिक गिरीपूंजे, उमेश वैद्य, मनोज वैद्य आणी गावकरी मंडळी उपस्थित होते.







