spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी करावी

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे निर्देश
नागपूर, दि. २6 : सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, भारतीय कृषी विमा कंपनी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, तालुका पातळीवरील कृषी यंत्रणा यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणे आवश्यक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 2025-26 मध्ये पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या सद्यस्थितीत कमी असून या योजनेला असलेल्या मुदतीच्या आत अधिकाधिक शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक (सर्व बँक), जिल्हा समन्वयक, भारतीय कृषी विमा कंपनी नागपूर हे उपस्थित होते तसेच तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व तालुकास्तरीय विमा कंपनी प्रतिनिधी हे ऑनलाईन प्रणाली द्वारे उपस्थित होते.
तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी सहाय्यक कृषी अधिकारी व बँकेमार्फत मोहीम स्वरूपात विमा अर्ज वाढवण्यासाठी प्रती दिन प्रति सहाय्यक कृषी अधिकारी 50 शेतकरी याप्रमाने जबाबदारी निश्चित करण्यात आली. पुढील 6 दिवसा मध्ये 300 शेतकरी याप्रमाने लक्षांक देऊन प्रत्येक उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्या मार्फत कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी निर्देश दिले.
अग्रणी बँक व सरव्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी कर्जदार शेतकरी यांचा पिक विमा काढण्याची मोहीम घेण्यास त्यांनी सांगितले. जिल्हा समन्वयक भारतीय कृषी विमा कंपनी नागपूर यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून तालुका निहाय कार्यालय स्थापन करावीत व विमा अर्ज वाढवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेऊन सहभागी व्हावे असे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले. शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मा जिल्हाधिकारी यांनी केले.

Popular Articles