spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हिंगणामध्ये निघाला ताजुद्दीन बाबांचा संदल

ताजुद्दीन औलियांच्या गीतांनी गुंजली हिंगणा नगरी

हिंगणा २६ : नागपूर येथील ताजबाग परिसरात असलेल्या हजरत बाबा ताजुद्दीन औलिया (र. अ.) यांच्या वार्षिक उरूसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंगणा तालुक्यातील भाविकांच्या वतीने गुरुवारी संदल निघाला. रायपूर हिंगणा येथील बाजार चौकात असलेल्या ताजुद्दीन बाबांच्या पंडाल शरीफमधून दुपारी १२ वाजता संदलची सुरुवात झाली.

हा संदल रायपूर बस स्टॉप, भोलाशा बाबा दर्गा, तिवरकरवाडी, मोकाशा बाबा दर्गा, गुजरी चौक, बालाजी चौक, गुप्ता हॉटेल मार्गे पुन्हा रायपूर बस स्टॉप येथून ताजुद्दीन बाबांच्या पंडालमध्ये पोहोचून समारोप करण्यात आला. आयोजक समितीच्या वतीने नागपूरच्या ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन औलिया (र. अ.) यांच्या मजार शरीफवर चादर अर्पण करून संदलचा समारोप करण्यात आला.

या संदलमध्ये घोडा, बग्गी, उंट, बँड पार्टी, टीलिया पार्टी, नगारा पार्टी, डीजे आणि झांक्यांचा समावेश होता. टीलिया पार्टीच्या तालावर “या ताज के रखना लाज, तेरे दिवाने आए है”, “भर दे झोली मेरी या मोहम्मद”, “चला चला रे, मेरे ताज का संदल” अशा ताजुद्दीन बाबांच्या भक्तीगीतांनी हिंगणा नगरी दुमदुमली. या गीतांवर ताजप्रेमी भक्तांनी मनसोक्त नृत्य करत श्रद्धा व्यक्त केली.

संदलच्या यशस्वी आयोजनासाठी हजरत बाबा ताजुद्दीन औलिया संदल कमिटी हिंगणा चे पदाधिकारी  इसूफ शेटे, सलाम महाजन, बबलू शेटे, इरफान शेख, अलीम महाजन, कदीर महाजन, हामिद शेटे, आरिफ महाजन, इमरान महाजन, अकबर सौदागर, शादाब छावरे, शहीद महाजन, रेहान महाजन, अयाज महाजन, सलीम गडकनोज, फरहान महाजन, असद महाजन, आसिम कनोजे, शहीद शेटे, फैजान महाजन, रिजवान महाजन, रियाज महाजन, अकरम शेख, शादाब शेख, पप्पू शेख आणि ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.

Popular Articles