spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हितासाठी “कॅरी ऑन” धोरण लागू करा – भाजयुमो विद्यार्थी आघाडीची विद्यापीठाकडे मागणी

 

नागपूर २६ : भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माननीय कुलगुरूंना आज निवेदन सादर करून तात्काळ विद्वत परिषद बोलवून “कॅरी ऑन” धोरण लागू करण्याची मागणी करण्यात आली.

विद्यापीठाच्या चुकीमुळे हजारो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहत असून त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. यापूर्वीही दोन वेळा निवेदनाद्वारे हीच मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करता विद्यापीठ प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा व कॅरी ऑन धोरण लागू करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीने घेतली आहे.

हे निवेदन भारतीय जनता पार्टी नागपूर शहराध्यक्ष मा. दयाशंकर तिवारी व भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहराध्यक्ष बादलजी राऊत, तसेच विद्यार्थी आघाडी शहर संयोजक शिवेष हारगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आशू गुमगावकर आणि शंतनु झाडे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.

यावेळी भाजयुमो दक्षिण नागपूर अध्यक्ष कुलदीप माटे, यश गौर, संकेत जवळकर तसेच अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.

Popular Articles