spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी तालुक्यात बकरी ईद उत्साहाने साजरी

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुदधा अल्लाहप्रति अखंड निष्ठा आणि त्याग व बलिदानाचा संदेश देणारी ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद कामठी तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . यानिमित्ताने बकरे, मेंढ्या आदींची मोठ्या प्रमाणात कुर्बानी देण्यात आली तर यावर्षी बकऱ्यांच्या बाजारात सुमारे दीड कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ईद निमित्त सकाळी 7.30 वाजता रब्बानी मैदान इदगाह तसेच कामठी महामार्गावरील ख्रिस्त चर्च जवळील पटांगण इदगाह येथे सकाळी साडे आठ वाजता मौलानाच्या नेतृत्वात व अनुयायांच्या मुख्य उपस्थितीत सामूहिक नमाज पठण करण्यात आले.याप्रसंगी सामूहिक नमाज पठणासाठी 200 च्या वर अनुयायांनी उपस्थिती दर्शविली होती तसेच शहरातील 43 मस्जिद मध्ये सुद्धा नमाज अनुयायांनी नमाज पठण केले.

सदर इदगाह मध्ये सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर उपस्थित समस्त मुस्लिम अनुयायांना उपस्थित माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे, ,पोलीस उपायुक्त संदीप पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे , एपीआय सचिन यादव , अखिलेश ठाकुर यांनी गळाभेट देऊन बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.