Home Latest News कामठी तालुक्यात बकरी ईद उत्साहाने साजरी

कामठी तालुक्यात बकरी ईद उत्साहाने साजरी

0

<p><strong>कामठी &colon;-<&sol;strong> दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुदधा अल्लाहप्रति अखंड निष्ठा आणि त्याग व बलिदानाचा संदेश देणारी ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद कामठी तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली &period; यानिमित्ताने बकरे&comma; मेंढ्या आदींची मोठ्या प्रमाणात कुर्बानी देण्यात आली तर यावर्षी बकऱ्यांच्या बाजारात सुमारे दीड कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते&period;<&sol;p>&NewLine;<p>दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ईद निमित्त सकाळी 7&period;30 वाजता रब्बानी मैदान इदगाह तसेच कामठी महामार्गावरील ख्रिस्त चर्च जवळील पटांगण इदगाह येथे सकाळी साडे आठ वाजता मौलानाच्या नेतृत्वात व अनुयायांच्या मुख्य उपस्थितीत सामूहिक नमाज पठण करण्यात आले&period;याप्रसंगी सामूहिक नमाज पठणासाठी 200 च्या वर अनुयायांनी उपस्थिती दर्शविली होती तसेच शहरातील 43 मस्जिद मध्ये सुद्धा नमाज अनुयायांनी नमाज पठण केले&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर इदगाह मध्ये सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर उपस्थित समस्त मुस्लिम अनुयायांना उपस्थित माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे&comma; &comma;पोलीस उपायुक्त संदीप पखाले&comma; सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर&comma;वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे&comma; &comma;वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे &comma; एपीआय सचिन यादव &comma; अखिलेश ठाकुर यांनी गळाभेट देऊन बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version