कन्हान :- रामटेक लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय अभ्यासु खासदार श्यामकुमार बर्वे यांची कन्हान – पिपरी नगरपरिषद येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी सदिच्छा भेट घेत कन्हान -पिपरी शहरातील विविध जनसमस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत कन्हान-पिपरी शहरातील प्रत्येक वॉर्ड चा समस्या व वाढती पाणी टंचाई, शुद्ध पाणी पुरवठा योजना, मान्सुनपूर्वी नाला, नाली सफाई, गडर गाडी उपलब्ध करुन देण्यात यावी, श्मशान भूमी व सौंदर्यकरण निधी मंजुर होहुन ही काम थांबले का ? तसेच दैनंदिन व आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, शासन प्रशासन यांचा कामाची दिरंगाई किंवा उदासीनता आदी समस्या नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभुत समस्यांचा विषय अत्यंत गांभी र्याने मांडण्यात आला. खासदार महोदयांनी नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने ऐकुण घेत तातडीने संबंधित विभागाशी समन्वय साधुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच कन्हान-पिपरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामांना गती देण्या सोबतच खासदार निधीतुन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. शहराच्या विकासात येणाऱ्या अडचणी दूर करून कन्हान – पिपरी शहराला विकासाच्या नव्या दिशेने नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी नगरसेविका रेखा टोहने, माजी न प उपाध्यक्ष योगेश रंगारी, नगरसेविका निती तेलोते, नगरसेवक समशेर पुरवले, प्रशांत बाजीराव मसार, सतिश भसारकर, अर्जुन पात्रे, काँगेस नेते तसेच माजी नगरसेवक, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकी दरम्यान संघटन बळकटीकरण, आगामी विकास आराखडा व जनहिताच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. शेवटी सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी खासदार श्यामकुमार बर्वे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.



