spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निवासी आयुक्त पदाचा कार्यभार सिंघल यांनी स्विकारला

नवी दिल्ली :- महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी आज आर. विमला यांच्याकडून निवासी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी विशेष आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या सिंघल यांची निवासी आयुक्त व सचिव म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.

सिंघल या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2009 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. यापूर्वी अमरावती विभागीय आयुक्त, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिव, सातारा जिल्हाधिकारी आदी पदांचा कार्यभार सांभाळला आहे.

Popular Articles