spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राणटी कुत्र्याच्या हल्ल्यात गायीच्या वासरूचा जागीच मृत्यु, तीन गायी जख्मि

कामठी :- मागील काही महिन्यांपासून कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात जंगली जनावराने चांगलाच हैदोस घातला असून बऱ्याचदा वाघाच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू तर जख्मि होन्याची घटना नित्याची झाली आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ तसेच शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे त्यातच काल सोनेगाव राजा येथील पंढरी भोयर यांच्या शेतात बांधून असलेल्या गायी व वासरुवर जंगली कुत्र्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गायीचा एक वासरू जागीच मृत्यू झाला तर तीन गायी गंभीर जख्मि झाल्याची घटना घडली.

घटनेची माहिती माजी सरपंच चंदु हेवट यांनी तहसिलदार, फॉरेस्ट विभागाला दिली असता संबंधित प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला. कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात जंगली जनावरांच्या हल्ल्यात गोवंश जनावरे , बकऱ्या मृत्युमुखी पडणे,जख्मि होणे हे नित्याचेच झाले आहे मात्र यावर संबंधित प्रशासकीय यंत्रणा गंभीर्याची भूमिका घेत नाही अश्या मृत्युमुखी घटनेला स्वाभाविक होण्यासारखे सोडले आहे मात्र भविष्यात अश्या घटना माणसावर हल्ले होऊन माणसाची जीवितहानी होण्याचा सपाटा सुरू होईल तेव्हा संबंधित प्रशासकिय यंत्रणा गांभीर्याची भूमिका घेऊन जागे होईल का?असा प्रश्न येथील जागरूक ग्रामस्थ माजी सरपंच चंदू हेवट,पोलीस पाटील राहुल ढोले तसेच समस्त ग्रामस्थांनी केले आहे.

Popular Articles